प्रतिनिधी
कणकवली
काश्मीर पेहलगाम येथे पर्यटकांची झालेली हत्या ही चीड येणारी घटना आहे. हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या. याबाबत विरोधकांनीही या दहशतवादाविरोधात साथ दिली. त्याबद्दल विरोधकांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. शंकराचार्यांचा मी आदर करतो. मात्र देश व जनतेपेक्षा मोठे कोणीही नाही. त्यामुळे देशाच्या हितासाठी कोणता निर्णय घेतला जात असेल तर त्यावर शंकराचार्यांनी बोलू नये, असे मला वाटते, असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी आज केले . येथील ‘ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते .








