वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून पीडीपी या स्थानिक पक्षाने आपले घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. या घोषणापत्रात घरांना विनामूल्य वीज, मंदिरे, मशिदी आणि प्रार्थनास्थळांना विनामूल्य वीज, पाणी करमुक्त आणि मीटरमुक्त, मुफ्ती मोहम्मद सईद योजनेचे पुनरुज्जीवन आदी आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. याशिवाय प्रदेशातील गरीब कुटुंबांना वर्षाला 12 गॅस सिलिंडर विनामूल्य पुरविण्यात येणार आहेत.
तसेच, वृद्धापकाळ निवृत्तीवेतनात दुप्पट वाढ केली जाणार आहे. विधवा निवृत्तीवेतनही दुप्पट पेले जाईल. पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ (शंकराचार्यांचे पीठ) पुन्हा क्रियान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या पीठाचा परिपूर्ण धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येईल. झम्मू-काश्मीरच्या मानवाधिकार प्राधिकारणाचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. लोकांच्या जमीनी आणि मालमत्तांचे संरक्षण करण्यात येईल, अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.









