Kasba Peth By Election Result : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भरसभेत हू इज धंगेकर? असा सवाल त्यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात पोस्टरबाजी करण्यात आली होती. मतदानानंतर दोन दिवसापासून सोशल मीडियावरही ‘Who is Dhangekar’ ची चर्चा होती. याबाबत कविता, मीम्स व्हायरल झाल्या. रवींद्र धंगेकरकरांच्या विजयानंतर आता आणखी एक कविता व्हायरल होत आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहेत. मुळे कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी आहे म्हणत पाटील यांना डिवचण्यात आलयं. तसेच लोकशाही विरुध्द हुकुमशाहीच्या लढाईमध्ये हुकुमशाहांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी चारी मुंड्या चीत करणारा शिवरायांचा मावळा आमदार रवींद्र धंगेकर अशी बॅनरबाजी करण्यात आली.
समाज माध्यमावर व्हायरल झालेली कविता..
Who is Dhangekar?
ज्याने पाडला गणेश बिडकर, केला गड सर,
Who is Dhangekar?
ज्याने वाटायला लावले, चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर,
Who is Dhangekar?
प्रचाराला लावले RSS चे केडर,भले-भले मोठे बिल्डर,
Who is Dhangekar?
देशाचे नेते फिरवले गल्लीभर,धास्तीने जागेच रात्रभर,
Who is Dhangekar?
ज्याने अश्रू आणले ओठांवर,बंगल्याचे ओझे पेठांवर,
Who is Dhangekar?
ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर,नदीत उतरून पहाय लावले ओंकारेश्वर
,Who is Dhangekar?
जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर,नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर,
Who is Dhangekar?
घाम फुटलाय ज्याच्या धाकावर,ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.कळले का? अशी कविता शेअर केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








