ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा हा भाजपचा नव्हे तर जनतेचा गड आहे. ज्या दिवशी माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपला 40 स्टार प्रचारकांची फौज पाठवावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारात उतरावं लागलं, त्याचवेळी मी निवडणूक जिंकलो होतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.
धंगेकर म्हणाले, ही निवडणूक जनतेनी हातात घेतली होती. जनतेने माझ्यावर विश्वास दाखला आणि त्याचे रुपांतर मतदानात झाले. कसबा हा भाजपचा नाही तर हा गड जनतेचा आहे. या विजयाचे श्रेय मी कोणत्या नेत्याला नाही तर फक्त मायबाप जनतेला देतो. या जनतेनेच मला निवडून आणलं आहे. ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नव्हती. मात्र पहिल्या दिवसापासून विजय मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले होते. जनतेने ही निवडणूक सोपी केली.
अधिक वाचा : भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार; कसब्यात काँग्रेसचे धंगेकर विजयी
निवडणुकीत मला साथ देणाऱ्यां जनतेचे आणि नेत्यांचे मी घरी जाऊन आभार मानणार आहे. खा. गिरीश बापट यांच्या घरी जाऊन त्यांच्याही तब्बेतीची चौकशी करणार आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणूनच मी राहीन. आमदार झालो म्हणून बदलणार नाही.