प्रतिनिधी,कोल्हापूर
Rajaram Sugar Factory Election 2023 : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी कसबा बावडा, पुलाची शिरोली ही दोन मतदान केंद्र पोलीस प्रशासनाने अतिसंवेदनशिल ठरविली आहेत. शिरोली येथे 964 तर कसबा बावडा येथे 975 असे उच्चांकी मतदान आहे. या दोन मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाचा विशेष वॉच असणार आहे. तर करवीर, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यातील 58 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. कारखान्यासाठी रविवार (23 एप्रिल) रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून निवडणूकीची तयारी सुरु आहे. करवीर, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यातील 58 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. राजाराम कारखान्याची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी गटासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. यामुळे अत्यंत दोनही गटाकडून अत्यंत काटाजोड लढत होत आहे. या निवडणूकीच्या निकालाचे जिह्याच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार असल्याने याचे पडसाद मतदानादिवशी व मतदानानंतर उमटण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने या निवडणूकीची संपूर्ण तयारी केली आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सामान्य, संवेदनशिल तसेच अतिसंवेदनशिल अशा प्रकारे मतदान केंद्रांची विभागणी करण्यात आली आहे. कसबा बावडा, पुलाची शिरोली ही मतदान केंद्र अतिसंवेदनशिल घोषीत करण्यात आली आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. मतदान केंद्रावर तसेच मतदान केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. प्रत्येक मतदानाच्या खोलीमध्ये 1 पोलीस कॉन्स्टेबल तर अतिसंवेदनशिल ठिकाणी 1 पोलीस उपनिरीक्षक नेमण्यात येणार आहे. मतदान केंद्राबाहेर राज्य राखीव दल, जलद कृती दलाचे पथक तैनात करण्यात येणार आहे. मतदान केंद्रामध्ये केवळ मतदारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. समर्थकांनी 100 मीटरच्या बाहेर थांबण्याच्या सुचना करण्यात आल्या आहे
बिंदू चौकात पोलिसांची कडक भूमिका
राजारामच्या प्रचारासाठी दिलेली आव्हाने आणि प्रतिआव्हाने देण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक व आमदार ऋतुराज पाटील हे आंबेडकर जयंती दिवशी बिंदू चौक येथे आले होते. यावेळी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत दोनही नेत्यांना समज दिली होती. दोनही गटाच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनाच प्रवेश देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली होती. यामुळे मतमोजणी आणि निकालावेळी कोणीही कायदा हातात घेवू नये अन्यथा गय केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाकडून याच दिवशी देण्यात आला होता. अशीच कडक भूमिका मतदान व मतमोजणी दिवशी घेण्यात येणार आहे.
हातकणंगलेत 26 मतदान केंद्रे
राजाराम कारखान्यासाठी हातकणंगले, करवीर या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधीक मतदान आहे. हातकणंगले तालुक्यात 26, करवीर मध्ये 23 तर राधानगरी 5, गगनबावडा 2, शाहूवाडी 1 तर शहरात 1 मतदान केंद्र आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई सुरु
राजाराम कारखान्याच्या हायव्होल्टेज लढतीसाठी पोलीस प्रशासनाची तयारी पुर्ण झाली आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशिल गावांचे व मतदान केंद्रांवर आत्तापासूनच लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. या गावांमधील काही नेत्यांसह कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई व नोटीस पाठविण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. कायदा व सुव्यस्थेचे प्रश्न निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही पोलीसांनी दिले आहेत.
राजाराम कारखान्याच्या मतदानासह, मतमोजणीची तयारी पुर्ण झाली आहे. पोलीस प्रशासनाने ज्या प्रमाणे बिंदू चौक येथे कडक भूमिका घेतली त्याच पद्धतीने मतदान व मतमोजणीदिवशी भूमिका घेण्यात येणार आहे. मतदान व त्यानंतर गावांमध्ये कोठेही पडसाद उमटू नये याची दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









