Kasba and Chinchwad Bypoll : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदानाला वेग आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा मतदार संघाचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीचे नाना काटेंनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच भाजपचे उमेदवार हेमंत रासने, अपक्ष उमेदवार आनेद दवे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मविआने जोरदार प्रचार केला.
चिंचवड मतदार संघात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि भाजपकडून अश्विनी जगताप अशी तिरंगी लढत आहे. तर कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विरूध्द हेमंत रासने अशी दुहेरी लढत आहे. दरम्यान मिठगंजमध्ये मतदान करू नये यासाठी महिलांना धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे. काही महिलांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला आहे.
दरम्यान, भाजपला पराभवाची भीती आहे. 5 ते 6 मंत्री प्रत्येक मतदारसंघात आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीवरून केली आहे.
Previous Articleचिंचवडमध्ये पोटनिवडणुकीला गालबोट; मतदान केंद्राबाहेर राडा
Next Article मुक्ताची उणीव भासली; मतदानानंतर शैलेश टिळक भावूक









