तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयांच्या गैरवापराचा आरोप : समितीच्या मनमानी कारभाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पणजी : कासारवर्णे येथील श्री सातेरी महादेव देवस्थानामध्ये गेल्या काही वर्षापासून सुऊ असलेले वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. देवस्थान समितीने मनमानी कारभारात देवस्थानच्या 1 कोटी 70 लाख ऊपयांचा गैरवापर केल्याप्रकरणी महाजनांनी आवाज उठविला असला आहे. त्यामुळे एका महाजनाला मारहाणीचा प्रकारही घडला आहे. गावातील शांतताभंग तसेच एकोपा नष्ठ करण्याचे काम समिती करीत असल्याची तक्रार पेडणे मामलेदारकडे करण्यात आली होती. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने आता हे प्रकरण मुख्यमंत्र्यापर्यंत पोचविण्यात आले आहे. देवस्थानचा हिशेब मागितला असता गोविंद नाईक (वय 58) याला समितीमधील एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली असून त्याबाबत मोपा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवस्थानातील गैरप्रकार तसेच लाखो ऊपयांचा गैरवापर केल्यामुळे देवस्थान समिती बरखास्त करावी म्हणून पेडणे मामलेदारांना कळविण्यात आले होते, मात्र त्यांनी काहीच केले नाही म्हणून काही महाजनांनी व नागरीकांनी हे प्रकरण आता मुख्यमंत्र्यापर्यंत पोचविले आहे. तक्रारीवर महाजन आणि नागरीक मिळून 39 जणांनी सह्या केल्या आहेत.
मागील देवस्थान समितीला 5 कोटी 64 लाख 16 हजार 111 रुपये इतकी रक्कम मोपा विमानतळासाठी देवस्थानच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यापोटी शासनाकडून आली होती. पूर्वीच्या समितीने यातील रक्कम खर्च केलेली नाही. त्यानंतर निवड झालेल्या विद्यमान समितीने देवस्थान खात्यातील उपलब्ध पैशातून श्री सातेरी देवी मंदिराच्या बांधकामाचे कंत्राट दिले. मात्र, किती रक्कम दिली, कोण कंत्राटदार? त्याबाबत महाजनांना काही सांगण्यात आले नाही. ठेकेदाराने फेब्रुवारी 2022 पासून बांधकाम बंद केले असून अद्याप मंदिराचे बांधकाम अर्धवट पडून आहे. त्यामुळे एकूण एक कोटी सत्तर लाखऊपयांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. मंदिराच बांधकाम सुरु करतेवेळी महाजनांना विश्वासात न घेता बांधकाम सुऊ करण्यात आले आणि नंतर ते अर्धवट ठेवण्यात आले. देवतांच्या मूर्त्या कुणालाही विश्वासात न घेता काढल्या. त्या मूर्ती आता कुठे आहेत, याची माहिती समितीकडून दिली जात नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
12 फेब्रूवारी 2023 रोजी अध्यक्ष केशव उ&फ प्रसाद बाबी नाईक यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यात आला. मात्र मामलेदारांनी त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. अजूनही तो आपणच अध्यक्ष असल्यासारखा वागत असून मनमानी कारभार करीत आहे. विद्यमान समिती आल्यापासून एकही वार्षीक सर्वसाधारण सभा झालेली नाही. तसेच नवीन महाजन करण्याबाबत कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. देवस्थांचे वार्षीक सणही साजरे केले जात नसल्यामुळे इतर काही महाजन ते करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही खंड पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोंदणीकृत देवस्थानाला मुक्तीपूर्व काळात मान्यता देण्यात आली असताना कायदेशीर असलेल्या या देवस्थानात सध्या बेकायदेशीर कारभार सुऊ आहे असे निवेदनात म्हटले आहे.









