कसबा बीड येथे शेतकरी संघ निवडणुकीसाठी 9 संघटनेचा एकत्रित बैठकीत निर्धार
कसबा बीड प्रतिनिधी
करवीर तालुक्यामध्ये कसबा बीड येथे आंदोलन करणारे शेतकरी नेते मुकुंदराव पाटील यांनी शेतकरी सहकारी संघ निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरला आहे. या संबंधी समविचारी 9 संघटनेचे पदाधिकारी , तसेच कसबा बीड भागातील शेतकरी , विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आदींच आज समविचारी मार्गदर्शक बैठक संपन्न झाली.यावेळी बोलताना शेतकरी नेते मुकुंदराव पाटील यांनी आंदोलन करून दिलेल्या निवेदनांना केराची टोपली मिळते,त्यामुळे आंदोलनकर्ते राजकारणात सक्रिय होणे गरजेचे आहे,असे म्हणाले. या समविचारी बैठकीचे अध्यक्ष माजी सरपंच सर्जेराव सुर्यवंशी होते.
आशिया खंडातील नावलौकीक कमावलेला शेतकरी सहकारी संघ निवडणूक 2024 कार्यक्रम सुरू झाला आहे. त्या अनुसंघाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कसबा बीड येथे शेतकरी संघात काम केलेले निवृत्त कर्मचारी दतात्रय कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. राहूल पाटील, बाजीराव देवाळकर, किशोर खाडे, ज्ञानदेव पाटील, भगवान सुर्यवंशी, नामदेव यादव, सागर बुरुड, भिकाजी कांबळे,बाळासाहेब नाईक, मुंकूंदराव पाटील, आदीची मनोगते झाली.
अध्यक्षीय भाषणात सर्जेराव सुर्यवंशी यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,महे व बीड यादरम्यान बास्केट ब्रिज झाला पाहिजे, सातेरी -महादेव डोंगरावर एमआयडीसी मंजूर व्हावी जेणेकरून भागातील तरुणांना रोजगार मिळेल,शेतकऱ्यांना सरसकट 50000/- कर्जमाफी मिळावी यासाठी पायी दिंडी काढली, एफ आर पी दर मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी काढलेल्या पदयात्रेस पाठिंबा देण्यासाठी घानवडे ते कोगे भागातील शेतकऱ्यांना घेऊन सहभाग घेतला इत्यादी अनेक आंदोलनामध्ये मुकुंद पाटील यांनी हिरीरीने भाग घेतला आहे,अशा तळमळीच्या कार्यकर्त्याला आपण सर्वांनी पाठिंबा देणे गरजेचे आहे असे आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी आम आदमी पार्टीचे किशोर खाडे ,शरद जोशी शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव पाटील, समता पार्टीचे सागर बुरुड ,अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे भिकाजी कांबळे, शेतकरी संघटनेचे बाळ नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर , गुणाजी शेलार ,कसबा बीड माजी सरपंच सर्जेराव सूर्यवंशी ,शाहू शिक्षण संस्था अध्यक्ष नामदेव यादव,श्रेयस गॅस एजन्सीचे भगवान सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, बाळासाहेब खांडेकर,नारायण कांबळे , घानवडेचे संदीप पाटील आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दिपक कुंभार व आभार सचिन पाटीत यांनी केले.