कास :
कास परिसर पर्यटनाचे आगार बनला असुन सुट्टीच्या दिवशी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजारो वाहने या परिसरात दाखल होत आहेत. मात्र, कास परिसरातील रस्त्यांची चाळण झाली असुन मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात अरुंद रस्ते आणि दुतर्फा पार्कंग होत असल्याने वाहतुक कोंडीही होत आहे. पुष्प पठार वरील फुलांचा हंगाम येत्या आठ दहा दिवसात सुरु होईल. त्यावेळी वाहतुक सुरळीत होणार का? की वाहने खड्यांसह तासनतास वाहतुक कोंडीत अडकुन पडणार असा प्रश्न निर्माण झाला असुन सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन वनविभाग काही उपाययोजना करणार आहे का?असा प्रश्न पर्यटक स्थानिकांकडून विचारला जात आहे. अद्याप कास पुष्प पठारवर तुरळक फुले उमलली असून फुलां ऐवजी रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे पाहुन आपण खड्डे पहायला आलोय की जणु चुकुन चंद्रावर आलोय असा भास तर होत नसेल ना ? चक्क जागतीक वारसा स्थळावरील रस्त्याची दुरवस्था झाली असुन कास तलाव घाटाई-कास रस्ता कास-तांबी वरजाई धबधबा भांबवली रस्त्याचीही चाळण झाली असल्याने येणाऱ्या वाहनांचा खुळखुळा होत आहे. रस्ता अरुंद असल्याने समोरसमोरून दोन मोठी वाहने आल्यास ति पास होत नसल्याने वाहतुक कोंडी होत आहे. त्यात कास तलाव परिसरात वाहनांची दुतर्फा बेशिस्तपणे पार्किंग होत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत आहेत.
- पोलिसांनी बेशीस्त पार्किंगला शिस्त लावावी
सार्वजनिक बांधकाम विभाग फुलांच्या हंगामाच्या आगोदर खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे फुलांच्या हंगामा वेळी पोलिसांनी बेशीस्त पार्किंगला शिस्त लावुन वाहतुक सुरळीत करावी अन्यथा वाहतुक कोंडीचा मोठा फटक स्थानिक आणी पर्यटकांना बसणार आहे.








