न्यायालयातील याचिकांवरील सुनावणी लांबणीवर, राज्य सरकार आणि विजय यांचे आरोप-प्रत्यारोप
वृत्तसंस्था / चेन्नई
गेल्या शनिवारी तामिळनाडूतील करुर येथे अभिनेता विजय याच्या सभेत झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांची संख्या आता 41 झाली आहे. सोमवारी एका जखमी महिलेचा मृत्यू झाल्याने ही संख्या एकाने वाढली. बळी गेलेल्यांमध्ये अनेक महिला आणि बालकांचा समावेश आहे. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आलेला आहे. या घटनेच्या संदर्भात अभिनेता विजय आणि तामिळनाडू सरकार यांच्यात शब्दयुद्ध भडकले असून हे प्रकरण न्यायालयातही पोहचले आहे. दोन्ही बाजूंनी परस्पविरोधी याचिका सादर केल्या आहेत.
अभिनेता विजय याच्या तामिळगा व्हेट्टरी कझगम या राजकीय पक्षाच्या सभेत ही चेंगराचेंगरी झाली होती. सभा लांबल्याने आणि विजय या सभेसाठी उशीरा पोहचल्याने ही घटना घडली असा आरोप स्थानिक प्रशासनाने केला आहे. 10 हजार लोक मावतील अशा जागेत 30 हजारांहून अधिक लोक भरल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. तसेच, अत्याधिक उष्णता आणि हवेतील आर्द्रता यामुळे अनेक लोक बेशुद्ध पडले असा आरोपही करण्यात आलेला आहे.
विजय यांचा कारस्थानाचा आरोप
विजय यांनी आपली सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला आहे. सभेवर कोणीतही बाहेरुन दगडफेक केली. तसेच, पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यामुळे लोक सैरावैरा धावत सुटले. परिणामी, अनेक महिला आणि मुले चिरडली गेली. या कारस्थानाच्या दृष्टीकोनातूनही या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे विजय यांचे प्रतिपादन आहे. या संदर्भात विजय यांनी सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठासमोर याचिका सादर केली आहे.
सीबीआय चौकशीची मागणी
या चेगराचेंगरीची चौकशी सीबीआय या केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून करण्यात यावी, अशीही महत्वपूर्ण मागणी विजय यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे. तामिळनाडू सरकार या घटनेची








