सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील नवोदित कवयित्री योगिता शेटकर लिखित”करुणेचा प्रवाह” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा 17 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजता श्रीराम वाचन मंदिरात होणार आहे. शेटकर यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. शेटकर यांना शालेय जीवनापासून कविता लिखाणाची आवड आहे. त्यांनी इलेक्ट्रिकमध्ये पदविका प्राप्त केली आहे. कोरोना काळात त्यानी असंख्य कविता लिहील्या. त्यांनी अनेक साहित्यिक कार्यक्रमात कवितावाचन केले. आकाशवाणीवर त्याची अलिकडे मुलाखत प्रसारीत झाली होती. कविता लिहीण्याबरोबर त्याना चित्र कलेची आवड आहे. कोरोना काळात अनेक चित्र रेखाटली. त्याच्या कविता सामाजिक भान जपणाऱ्या आहेत. त्याच्या कवितासंग्रहाचे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ऍड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ललित लेखक प्रा.वैभव साटम, अध्यक्ष समाज साहित्य प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग मधुकर मातोंडकर उपस्थित राहणार आहेत. साहित्य रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शेटकर परिवार सावंतवाडी यांनी केले आहे.









