वृत्तसंस्था/ कोलंबो
अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी लंकेने राष्ट्रीय संघाची घोषणा केली असून सलामीवीर दिमुथ करुणारत्नेचे दोन वर्षानंतर संघात पुनरागमन झाले आहे.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका हुकल्यानंतर दुश्मंता चमीराचेही संघात पुनरागमन झाले आहे. या दोघांव्यतिरिक्त नवोदित लेगस्पिनर अष्टपैलू दुशान हेमंता यालाही या संघात स्थान मिळाले आहे. शुक्रवारपासून या मालिकेला सुरुवात होत असून यातील सर्व सामने हंबनटोटा येथे खेळविण्यात येतील. लंकेने अद्याप वनडे वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविली नसून झिम्बाब्वे येथे होणाऱ्या पात्रता स्पर्धेत त्यांना खेळावे लागणार आहे. त्याच्या तयारीसाठी ही मालिका त्यांना उपयुक्त ठरणार आहे.
लंका संघ : दसुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डिसिल्वा, चरित असालंका, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, दुशान हेमंता, वनिंदू हसरंगा, लाहिरु कुमारा, दुश्मंता चमीरा, कसुन रजिता, मथीशा पथिराना, महीश थीक्षणा.









