प्रतिनिधी/ बेळगाव
जालगार गल्ली येथील कालिका दैवज्ञ महिला मंडळाच्यावतीने कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. ‘सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन आरोग्य, ऐश्वर्य, शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरतपणे प्राप्त होवो’ ही प्रार्थना करून मंडळाच्या भगिनींनी कालिकामातेच्या चरणी रांगोळी रेखाटून दीप प्रज्वलित केले.
देवीची सामुदायिक आरती झाल्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्षा शुभांगी कारेकर, उपाध्यक्षा सुलभा कारेकर, खजिनदार शैलजा कारेकर, उपखजिनदार नम्रता महागावकर, सेपेटरी नीता शिरोडकर यासह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.









