रत्नागिरी :
कार्तिकी एकादशीनिमित्त आज मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी येथील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, कार्तिकी उत्सवाने वातावरण भक्तीमय झाले आहे.
येथील उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच रत्नागिरी शहरात भाविकांची गर्दी वाढली होती. येथील श्री विठ्ठल मंदिराचा कार्तिकी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कार्तिकी एकादशीला पहिली पूजा झाल्यानंतर पहाटे काकड आरती होऊन उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम आणि श्री विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सुरू झाली आहे. या उत्सवाच्या यात्रेमुळे रत्नागिरी शहर गजबजून गेले आहे








