कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांचा ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत होती. मुदस्सर अजीज यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. निर्माते आता ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या सीक्वेलची तयारी करत आहेत.

कार्तिक अन् भूमी पुन्हा एकदा ‘पती पत्नी और वो 2’ मध्ये दिसून येणार आहेत. चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित केला जाऊ शकतो. यावेळी चित्रपटात अनन्या पांडेच्या ऐवजी अन्य अभिनेत्रीची निवड केली जाणार असल्याचे मानले जात आहे. याचमुळे निर्माते नव्या अभिनेत्रीचा शोध घेत असल्याचे समजते.
अनन्या पाडे सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटावरून चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. तर भूमी पेडणेकर यापूर्वी ‘अफवाह’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसून आली होती. भूमी पुढील काळात ‘भक्षक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक यापूर्वी कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटात दिसून आला होता. पुढील काळात तो ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातून झळकणार आहे.









