वृत्तसंस्था/ माद्रिद
कॅरोलिना मुचोव्हाने या मोसमातील शानदार कामगिरी पुढे चालू ठेवताना येथे सुरू असलेल्या माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत अॅनेट कोन्टावेटचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मुचोव्हाने कोन्टावेटवर 6-2, 6-2 असा विजय मिळविला. मागील वर्षी मुचोव्हाला पोटाचा व घोट्याचा त्रास झाल्याने बराच काळ ती टेनिसपासून दूर होती. यावर्षी पुनरागमन केल्यापासून तिने चमकदार प्रदर्शन केले असून दुबई व इंडियन वेल्स स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. यावर्षीचे तिचे रेकॉर्ड 16-5 असे आहे. अन्य एका सामन्यात एलिजाबेत कॉक्सियारेटोने बार्बरा स्ट्रायकोव्हाचा 6-3, 7-5 असा पराभव केला. पॉला बेडोसाशी तिची पुढील लढत होईल.









