आपल्याला जनरली मसाले राइस, प्लेन राइस, जिरा राइस हेच प्रकार माहित असतात पण कर्नाटकातला अंत्यत प्रसिध्द असा भिशी बेळे भात जो अनेक भाज्या आणि कडधान्य युक्त कर्नाटकी पद्धतीचा भीशी बेळे भात कसा करायचा हे शिकणार आहोत.
साहित्य
१ वाटी तांदूळ (धुवून पाणी काढून ठेवा)
१ वाटी तूर डाळ (करण्याआधी १ तास धुवून १ वाटी पाणी घालून ठेवा)
१ वाटी फरसबीचे १ इंचाचे तुकडे
१ वाटी फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे
१ वाटी गाजराचे १ इंचाचे तुकडे
अर्धी वाटी सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे
१ मोठा कांदा लांब उभा चिरलेला
१ टोमॅटो लांब उभा चिरलेला
१ बटाटा सालं काढून मोठे तुकडे केलेला (ऐच्छिक)
१ टेबलस्पून तेल
२ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ
बोराएवढा गूळ (ऐच्छिक)
पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
मोहरी-पाव टीस्पून हिंग-अर्धा टीस्पून हळद
७-८ कढीपत्त्याची पानं
४-५ वाट्या पाणी
कृती
एका मोठ्या पातेल्यात तेल तापवा आणि नेहमीसारखी फोडणी करा. त्यात हिंग, हळद आणि कढीपत्ता घाला. नंतर त्यात कांदा घाला. एखादा मिनिट परतून टोमॅटो घाला. परत एखादा मिनिट परता आणि इतर सगळ्या भाज्या घाला. भाज्या चांगल्या परतून घ्या. त्यात धुतलेली डाळ पाण्यासकट घाला. मंद आचेवर झाकण घालून शिजू द्या. डाळ अर्धवट शिजली की त्यात धुतलेले तांदूळ घाला. नीट हलवून घ्या. त्यात वाटलेला मसाला, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घाला. नीट मिसळा आणि त्यात ४ वाट्या गरम आधणाचं पाणी घाला. मधूनमधून हलवत, झाकण ठेवून मंद आचेवर भात अगदी मऊ शिजू द्या. अंदाजानं पाण्याचं प्रमाण वाढवा. भिशी बेळे भात तयार आहे. भात खायला देताना बरोबर तळलेले पापड, सांडगी मिरची द्या. भातावर साजूक तूप घालून खा. इतका भात वन डिश मील म्हणून ३-४ लोकांना पुरे होतो. हा भात कुकरलाही करता येतो. पण त्याचा अंदाज येणं गरजेचं आहे कारण अंदाज चुकला तर तो खाली लागतो.
Previous Article‘सात’ दहशतवाद्यांना कंठस्नान..!
Next Article साळिस्ते येथील युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू









