वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
त्यागराज स्टेडियमवर झालेल्या 22 व्या राष्ट्रीय अंधांच्या ऍथलेटिक्स स्पर्धेत कर्नाटकाच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विविध राज्यातील 31 पुरुष आणि 28 महिला असे एकूण 59 खेळाडूंनी आपला सहभाग दर्शवला होता. सदर स्पर्धा टी 11, टी 12, टी 13, अशा तीन विविध क्रीडा प्रकारामध्ये राज्य आणि संस्था स्तरावर खेळवली गेली.
या स्पर्धेमध्ये त्रिपुरा, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगाल, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे सरचिटणीस गुरुशरण सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये कर्नाटकाच्या पुरुष संघाने विजेतेपद मिळवले.









