ज्युनियर मास्टर्स व दिव्यांग गटात बेळगावच्या खेळाडूंचा समावेश
बेळगाव : गोकर्ण येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना कारवार जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 15 व्या वरिष्ठ मास्टर्स दिव्यांग शरीरसौष्ठव निवड चाचणीत बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंची निवड कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघात झाली आहे. छत्तीसगड बिलासपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर्स मास्टर्स व दिव्यांगा शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये ज्युनियर गटात श्रीशिव मोदगेकर, श्रवण लाड, जितू काई, अवनिश रविंद्र पार्थ, विनित हणमशेठ, एन. भरत, चिराग आर., शिव खातेगौडर यांची निवड झाली आहे. तर वयस्करांच्या गटात प्रताप कालकुंद्रीकर, राघवेंद्र नाईक, हेमंतकुमार यांची 40 ते 50 वयोगटात निवड झाली आहे. श्रवणन एच., शेबालाल छप्परबंद यांची 50 ते 60 किलो वजनी मास्टर्स गटात निवड झाली आहे. सदानंद बडवण्णाचे, राजकुमार बोकडे यांची 60 किलो मास्टर्स गटात निवड झाली आहे. तर दिव्यांग गटात मोहम्मद हुसेन जमादार याचीही वर्णी लागली आहे. गोकर्ण येथे झालेल्या या निवड चाचणीत या खेळाडूंची निवड करण्यात आली असून निवडलेला संघ 29 व 30 मार्च दरम्यान बिलासपूर छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या निवड चाचणीत आशियाई पंच गंगाधर एम., सुनील राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.









