कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसने अधिकृतपणे सिद्धरामय्या यांचे नाव घोषित करून अनेक दिवसांची प्रतिक्षा संपवली. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन अनेक महत्वाची खाती त्यांना देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांचा शपथविधी सोहळा 20 मे रोजी बेंगळूर येथे होणार असून या संबंधीची माहीती काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यामध्ये जारदार रस्सीखेच चालु होती. कॉंग्रेस नेत्य़ांमध्ये गेले चार दिवस दिल्लीमध्ये मुख्य़मंत्री कोणाला करावे यासाठी खल चालु होता. दोन्ही तोलामोलाच्या उमेदवारांपैकि एकाची निवड करणे पक्षश्रेष्ठींना कठिण जात असतानाच काल सिद्धरम्मैया यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सर्वकाही ठीक असून यापुढेही सर्व चांगलं होईल. आपल्या सर्वांना एकत्र काम करायचं असल्याचं राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे. आणि ते आपण स्वीकारलं आहे.” अशी भावना डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या ट्विटरवर पोस्ट टाकताना ते म्हणाले, “कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि लोकांचे कल्याण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही याची हमी देण्यासाठी एकजूट आहोत” अशा भावना व्यक्त केल्या.