कर्नाटक दहावीचा निकाल जाहीर झाला असून चित्रदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर, चिकोडी १२व्या स्थानावर तर, बेळगाव २६ व्या क्रमांकावर आहे. यंदा ८३.% निकाल लागला असून एकूण ७ लाख ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील ४ विद्यार्थी ६२५ पैकी ६२५ गुण मिळविलेले असून ३,४१,१०८ विद्यार्थी व ३,५९,५११ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. २३ जिल्ह्यांना ‘ए’ ग्रेड, १२ जिल्ह्यांना ‘बी’ ग्रेड देण्यात आले आहेत. १५ मे ते २१ मे च्या दरम्यान पुर्नमुल्यमापन करण्यासाठी संधी आहे. तसेच आजपासून १५ मे पर्यंत अनुत्तीर्ण विद्यार्थी पुनःपरीक्षेसाठी नाव नोंदवू शकतात.










