कागल / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने दडपशाही परवानगी करत नाकारली. तसेच कोल्हापुरातून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही मेळाव्याला येण्यापासून रोखण्यात आले.याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.अडीच हजार सीमाबांधव मोटारसायकलने कोल्हापुरात दाखल होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोलनाका परिसरात कर्नाटक पोलीस प्रशासनाने मोठा फौज फाटा तैनात केला आहे. सीमा भागातील मराठी बांधव दुचाकी रॅलीने कोल्हापूरला येणार आहेत.कर्नाटक राज्यातील सीमाभागातून येणाऱ्या मराठी बांधवांचे स्वागत कोल्हापूर शहर, कागल शहरातील प्रमुख मान्यवर व मराठी बांधवांच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर दूधगंगा नदीवरील पूलावर करण्यात येणार आहे
Previous Articleतांत्रिक युगात लोकजागरणाचे कीर्तन देश, काळ परिस्थितीनुसार व्हावे
Next Article आमदार लोबो कुटुंबियांना पर्यटनमंत्र्यांकडून शुभेच्छा








