ऑनलाईन टीम/तरुण भारत
Karnataka Accident : कर्नाटकात (Karnataka) हासन (Hasan) जिल्ह्यात तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात (Accident) झालाय. या अपघातामध्ये चार लहान मुलांसह ९ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झालेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. धर्मस्थळ, सुब्रमण्य, हसनंबा मंदिरांना भेट देत टेम्पो ट्रॅव्हलरमधून भाविक परतत होते, यावेळी अर्सिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर वाहन, कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस आणि KMF दूध वाहन यांच्यात जोरदार धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुध घेऊन जाणारा टँकर, कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस आणि एका टेम्पोचा अपघात झाला. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण टेम्पोमधून प्रवास करत होते. बस आणि दूध टँकरच्या मधे टेम्पो चिरडला गेला. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी ६ जणांचा मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
हे ही वाचा : आठ वर्षात दीड हजार कालबाह्य कायदे रद्द
हासनचे पोलिस अधीक्षक हरिराम शंकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. तसंच पंचनामा झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, टेम्पोतून प्रवाशी हसनंबा मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होते. त्यावेळी गांधीनगरजवळ दुधाच्या वाहनाला टेम्पोची धडक बसली.









