Sanjay Raut on Eknath Shinde : सीमाप्रश्नी अमित शाहांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमकं काय केलं? मुख्यमंत्री शिंदे गप्प का?तुमची मजबुरी काय आहे? तुम्हाला कोणाची भिती वाटते? दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी गुंगीच औषध दिलं का?बोम्मई रोज अपमान करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. आज माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणूनबुजून आग लावतायत. बोम्मई रोज महाराष्ट्राच्या कानफडात मारतात.मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात, हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे. छगन भुजबळ यांच्या सोबत तुम्ही तुरुंगात होतो असे सांगता.मग लाठ्या खाल्ल्या ते दाखवा.तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही भूमिका घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर काही बोलत नाहीत. तुम्ही जर भूमिका घेणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यास योग्य नाही अशी टीका राऊत यांनी केली.
Previous Articleगांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता
Next Article बसथांब्याचे पार्किंग लॉटमध्ये रूपांतर…








