बेंगळुरू : पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागात आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये कोणतेही विकास काम हाती घेणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज त्यांच्या केरळच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या शासकिय निवासस्थानी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले की, “मुख्यमंत्री विजयन दक्षिण क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीसाठी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी कर्नाटकात आले होते. केरळ सरकारने कन्हानगड-कनियुर रेल्वे मार्ग आणि इतर महामार्ग प्रकल्पांसह विविध रेल्वे प्रकल्पांसाठी प्रस्ताव ठेऊन सहकार्य मागितले.”
पुढे बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले,”प्रस्तावित कन्हानगड-कनियुर रेल्वे लाईन प्रकल्पामध्ये केरळमधून 40 किमी आणि कर्नाटकमधून 31 किमीचा मार्ग जातो. तसेच, हा मार्ग पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधता आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागातून जातो त्यामुळे हा प्रकल्प कर्नाटकसाठी फारसा लाभदायक नाही.” असे स्पष्ट केले. शेवटी बोलताना “या करणामुळे केरळच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, कर्नाटक राज्याला या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य देणे शक्य नाही,” असे मुख्यमंत्री बोम्माई यांनी स्पष्ट केले.
Previous Articleपुणे महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार
Next Article कर्नाटक-महाराष्ट्र ‘हिंदकेसरी’ ‘नाग्या’चा मृत्यू








