Sanjay Raut : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाची ( Samrudhi Hayway ) पहाणी कराणार आहेत. अशा परिस्थीतीत नागपूर विमानतळाच्या (Nagpur Airport ) बाहेर कर्नाटक (Karnatak ) राज्याचे पोस्टर झळकले असून यामध्ये कर्नाटक सरकारच्या विविध पर्यटन स्थळाची जाहीरात केली आहे. याचबरोबर चला कर्नाटक पाहू असा संदेशही दिला आहे. या जाहीरातीवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई (CM Bommai ) आणि पर्यटनमंत्री आणि आनंद सिंह यांचेही फोटो आहेत. पण याअगोदर कालच भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषद घेतली. त्यात त्यांनी कर्नाटक सरकारच्या आरेला कारेने उत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. या गोष्टीला प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
पत्रकारांशी बोलताना खा. संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले, “ कर्नाटकचे फलक हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कर्नाटक सरकारने दिलेलं आव्हान आहे. तसेच महाराष्ट्राला दिलेलं आव्हान आहे. भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणतात की, कर्नाटकच्या आरेला कारे असं उत्तर देऊ….आरे आणि कारेवाल्यानो कर्नाटक आतमध्ये घुसलं आहे…तुम्ही कधी कारे करणार? नागपुरला तुमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या थोबाडावर त्यांनी पोस्टर चिकटवलं आहे….कोणी म्हणतय गुजरातला येऊन बघा, कोणी म्हणतय कर्नाटकला येऊन बघा, कुठेय महाराष्ट्र तुमचा? चुल्लुभर पानी मै डूब जावो.. तशी तुमच्यावर वेळ आलेली आहे. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षावर आहे आणि तुम्हाला उद्यापर्यंत समजेल विरोधी पक्ष काय करतोय.”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








