खानापूर प्रतिनिधी – खानापूर येथे 2006 साली झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम तसेच शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. खानापूर न्यायालयात त्याची सुनावनी गुरुवार 27 रोजी ठेवण्यात आली होती. त्यासाठी नितीन बानगुडे पाटील व रामदास कदम हे गुरुवारी सकाळी 11 वाजता खानापूर न्यायालयात हजर झाले होते. खानापूर न्यायालयाने 30 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. यावेळी कर्नाटक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पत्रकारांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला, त्यामुळे दोन्ही नेत्यांची पत्रकारांशी चर्चा होऊ शकली नाही.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








