Sharad Pawar News : आजचा निकाल आगामी निवडणुकीचं चित्र स्पष्ट करणारा आहे. खोक्याचं राजकारण लोकांना आवडलं नाही. काँग्रेसच कौतुक आहे. नेते फोडून राजकारण करणाऱ्यांचा भ्रम दूर झाला आहे. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. अस म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे अभिनंदन केलं. कर्नाटकात काँग्रेसने मिळवलेल्या यशावर आज त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपची जरी सत्ता कर्नाटकात असली तरी त्यांचा पराभव होणार अशी आम्हाला खात्री होती. कारण तेथे जनतेत भाजप विरोधात प्रचंड रोष होता. भाजपने जिथे त्यांचे राज्य नाही तेथे सरकार फोडून त्यांची सत्ता आणण्यासाठी सत्तेचा वापर करण्याचं सूत्र वापरलं. कर्नाटकातही तोच फॉर्म्यूला वापरला.मध्यप्रदेशातही हाच फॉर्म्यूला वापराला ही खेदाची गोष्ट आहे. दुसरीकडे खोक्याचं राजकारण लोकांना आवडलं नाही हे कर्नाटक निकालावरून सिध्द झालयं. कर्नाटकात भाजपच्या दुप्पट जागा मिळवत काँग्रेसला यश मिळाले तर भाजपचा सपशेल पराभव झाला. याचा मुख्य कारणं सत्तेता गैरवापर, साधनांचा गैरवापर, फोडाफोडीचं राजकारण आहे.
भाजपनं देशात ज्यापध्दतीने वातावरण तयार केलयं त्याला एक प्रकारचा धडाचं काँग्रेसने शिकवला आहे. ही प्रकिया संपूर्ण देशात होईल, असं ही शरद पवार म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








