Mallikarjun Kharge : कर्नाटकात आतापर्यंत काँग्रेसने 136 जागांवर आघाडी करत भाजपला पिछाडीला टाकले आहे. भाजपपेक्षा दुप्पट जागेवर आघाडी घेतली आहे. भाजपच्या या निकालाने कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यात
डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची नावे समोर आली आहेत. एकीकडे मुख्यमंत्री तर दुसरीकडे बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेस तयारीत आहे. यासाठी एकही उमेदवार हातून सुटू नये यासाठी जय्यत तयारी केली आहे. या सर्व घडामोडीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खारगे काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. आमच्या पक्षात एक प्रक्रिया आहे. त्यानुसारच निर्णय घेतले जातात अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खारगेंना दिली.
यावेळी बोलताना मल्लिकार्जून खारगे म्हणाले,आमच्या पक्षात एक प्रक्रिया आहे.कधीही कोणत्याही राज्यात निवडणूक झाल्यावर आम्ही त्या प्रक्रियेनुसारच निर्णय घेतो.त्यानुसार आमदारांची बैठक बोलावली जाते. केंद्रीय निरीक्षक बैठकीला जातात. बैठकीतून जे मत तयार होईल ते पक्षश्रेष्ठींना सांगितलं जातं. त्यात मी,राहुल गांधी असे सगळे नेते असतात. सर्व लोक मिळून त्यावर निर्णय घेतो. मात्र,ही नंतरची गोष्ट आहे.हा लगेच घेतला जाणारा निर्णय नाही, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी बोलताना म्हणाले की,आम्ही कर्नाटकच्या गरीब जनतेला पाच आश्वासनं दिली होती.आम्ही ही आश्वासनं पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू , असे आश्वासन दिलं.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









