10 मे रोजी होणाऱ्य़ा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election) मतदानादिवसाच्या काही दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Smit Shah) यांनी राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नसून मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण हे घटनाबाह्य आहे. आणि म्हणूनच, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ते काढून टाकले असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा >>>> सोनिया गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे कि, “आमच्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. आरक्षणांतर्गत आरक्षण खूपच विचार करून दिले आहे. कर्नाटक निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले पाहिजे की, काँग्रेसने मुस्लिमांच्या आरक्षणात वाढ करून 4 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणणार आहेत काय? आणि तसे केल्यावर कॉंग्रेस कोणाचे आरक्षण कमी करणार आहे ? “असा प्रश्न त्यांनी विचारला.
हुनागुंडा येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले कि, “भाजपने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर बंदी घालून देशाची सुरक्षा मजबूत केली आहे, परंतु काँग्रेस पक्ष या गोष्टीच्या विरोधात आहे. भाजप मुस्लिम आरक्षणाला परवानगी देणार नाहीच तसेच राज्यातील लिंगायत आरक्षणही कमी होऊ देणार नाही.” असे म्हटले आहे.
काँग्रेसवर हल्ला करताना शाह पुढे म्हणाले, “काँग्रेस सर्वत्र खोटी आश्वासने देत असून त्यामुळेच निवडणुका हरत आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) यांच्या पाठिंब्यामुळे कर्नाटकचे लोक संतापले आहे.”