या आठवड्याच्या शेवटी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून विरोधक आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या वाद सुरु आहे. त्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षावर जोरदार टिका केली. शिवकुमार यांनी जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर निशाणा साधताना गेल्या वर्षी राष्ट्रपतीपदाची निवडणूकीत जेडिएस पक्षाने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता हे विसरू नये. असा टोला लगावला आहे.
हेही वाचा >>>संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकल्याबद्दल काँग्रेसवर कुमारस्वामी यांनी केली टीका
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार म्हणाले, “संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. एचडी कुमारस्वामी यांनी हे विसरू नये की, ज्यावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा त्यांच्या पक्षाने देशाच्या राष्ट्रपतींच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता.” अशी आठवण डिके शिवकुमार यांनी करून दिली आहे.
जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी कॉंग्रेस पक्षाने नविन संसद भवनाच्या उद्धाटन समारंभावर बहिष्कार टाकल्याच्या भुमिकेवर टिका केली आहे. कॉंग्रेस काही विशिष्ट लोकांच्या मतासाठी राजकारण करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.