बेंगळूर : राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान “40 टक्के कमिशन सरकार” अशी टिका केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रविवारी काँग्रेसवर आणि विशेषतः गांधी घराण्यावर निशाणा साधला. यासंदर्भात ‘मी नकली गांधीविषयी काय बोलू?’ अशी प्रतिक्रिया दिली. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये टिकाटिप्पणी होत आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज गांधी जयंतीनिमित्त प्रसारमाध्यमांना संबोधित केले. त्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि डीके शिवकुमार यांना जामिनावर सोडल्याबद्दल फटकारले. त्यांनी कर्नाटक राज्य कॉंग्रस पक्षासाठी “एटीएम” असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना ते म्हणाले “आज गांधी जयंती असल्याने मी खोट्या गांधींबद्दल कशासाठी बोलू? संपूर्ण काँग्रेस पक्ष जामिनावर बाहेर आहेत. कर्नाटक हे काँग्रेस पक्षासाठी एटीएम होते. पण आता कॉंग्रेस पक्ष संपला आहे.”असे ते म्हणाले. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
कर्नाटक कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “होय, मी जामिनावर आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधीही जामिनावर आहेत. भाजपचेसुद्धा डझनभर नेते जामिनावर आहेत. येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा नाही? बोम्माई यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले आहेत.”
Previous Articleशोपियां चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान
Next Article मच्छीमारांच्या जाळ्यात ‘जिभोळा’









