बेळगाव : वीजदर वाढीविरोधात कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीच्या वतीने 22 जून रोजी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे.
हेस्कॉम वीज पुरवठा महामंडळाकडून वीज शुल्कात भरमसाठ दरवाढ केल्याच्या निषेधार्थ सर्व व्यापार्यांनी आणि उद्योगधंद्यांनी एक दिवस व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून वीज दरवाढीमुळे होणार्या पाfरणामांचे गांभीर्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अधिकारी िकंवा सरकारी प्रतिनिधाRकडून कोणताहि तोडगा निघत नाहि. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बंदची हाक दिली आहे.. त्यावर उपाय शोधून वीज शुल्कात कपात करण्याची मागणी आहे. या विनंतीला सरकार प्रतिसाद देईल, असे राज्य चेंबर ऑफ कॉमर्सने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.