भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकचे आमदार सिद्दू सावदी यांनी जैन साधू कमकुमार नंदी महाराज यांच्या हत्येमागे दहशतवादी संघटना आयसआयस ISIS असल्याचा दावा केला असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तेरदल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार असलेले सिद्धू सावदी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “जैन साधूची हत्या ही आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने केली आहे. एवढ्या क्रूर पद्धतीने कुठलाही भारतीय कुणाचीही हत्या करू शकत नाही. सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून या प्रकरणी योग्य कारवाई केला पाहिजे. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवून लवकरात लवकर हे पर्करण निकली काढले पाहीजे.” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना भाजप आमदार सावदी म्हणाले कि, “ही हत्या इतकी हिंसक होती की त्या जैन साधूला विजेचा धक्का देऊन त्याचे तुकडे करून बोअरवेलमध्ये टाकण्यात आले. जैन साधूंना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. तसेच या निर्घृण हत्येनंतर त्यांना इतर जैन साधूंच्या सुरक्षेची खूपच काळजी वाटत आहे.”









