बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधान परिषदेच्या (Legislative Assembly) सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे आगामी ३ जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मंगळवारी उमेदवारांची घोषणा केली. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियरप्पा (B S Yediyurappa) यांच्या मुलाचे तिकीट कापल्याने त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.
त्यामुळे कर्नाटकात ३ जूनला होणाऱ्या निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. भाजपकडून मंगळवारी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. तर काँग्रेसकडूनही यादी जाहीर कण्यात आली. भाजपकडून जाहीर कण्यात आलेल्या यादीत माजी मुख्यमंत्री बीएस येडियरप्पा (Yediyurappa) यांच्या मुलाच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही. बीवाय विजयेंद्र हे कर्नाटक भाजपचे (bjp) प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांना तिकीट नाकरण्यात आल्याचे समजते आहे.
कर्नाटक विधान परिषदेच्या (Legislative Assembly) निवडणुकीसाठी भाजपने 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. चालुवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस केशवप्रसाद, लक्ष्मण सवदी, बसवराज होरत्ती यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा (Yediyurappa) यांच्या पुत्र विजयेंद्र यांना तिकीट मिळालेले नाही.









