बेंगळूर : काँग्रेसने गुरुवारी भाजप आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यावर निशाणा साधून आरोप केला की एका खाजगी संस्थेला घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी नियुक्त केले आहे. ज्याचा वापर निवडणुकांसाठी केला जाईल. भाजपने केलेल्या निवडणूक फसवणुकीवर प्रतिक्रिया देताना, जेडी(एस) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी सांगितले की, सत्ताधारी भाजप जे करत आहे ते यापूर्वी काँग्रेसनेही केले आहे.
सत्ताधारी भाजप सरकार खासगी एजन्सीमार्फत मतदारांचा डेटा चोरत असून त्याचा वापर येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी केला जाईल असा आरोप काँग्रेसने काही दिवसापुर्वी केला होता. त्यानंतर कर्नाटक राज्यात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. कॉंग्रेसने यासाठी मुख्यमंत्री बोम्माई, बीबीएमपीचे विशेष आयुक्त तुषार गिरीनाथ आणि निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
गुरुवारी प्रसारमाध्यमांशी यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, भाजपने निवडणुकीत फसवणूक करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले असून ही कंपनी एका मोठ्या मंत्र्याची आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “याआधीही हा घोटाळा उघडकिस येण्यापुर्वी याच कंपनीने रात्रीच्या वेळी बीबीएमपीची कागदपत्रे जाळली होती. तसेच कॉंग्रेसनेहा यापुर्वी तेच केले आहे जे भाजप आता करत आहे.”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








