ऑनलाईन टिम कलबुर्गी
कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापुरा शहराजवळ शुक्रवारी सकाळी अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात खासगी ट्रॅव्हल्सला आग लागल्याने बसमधील सात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबादहून गोव्याकडे जाणारी खाजगी बस ट्रॅव्हल्स कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर शहराजवळ आल्यावर एका मालवाहू वाहनाला धडकली. या धडकेनंतर बस काही अंतरावर पल्टी होऊन एका खड्ड्यात पडली. बस पडल्याने तीला आग लागून त्यामध्ये प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या बसमध्ये सुमारे 29 जण गोव्याहून हैदराबादकडे प्रवास करत होते. अपघातामध्ये यामधील 7 जणांचा मृत्यु झाला असून मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पीडितांबद्दल शोक व्यक्त केला. आपल्या प्रसिध्दीपत्रकात ते म्हणाले “कलबुर्गी बस दुर्घटनेत सात जणांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले आहे. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी माझ्या सदिच्छा आहेत”.