राज्याच्या निवडणुकांच्या निकालानंतर आपला पक्ष कॉंग्रेस किंवा भाजप यांच्या बरोबर युती करण्यास तयार आहे असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलर नेते एचडी कुमारस्वामी यांनी घोषित केले आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीपूर्वी कुमारस्वामी यांनी आपल्या संभाव्य ऑफर दिली. निवडणुकिनंतर वेगवेगळ्या एक्झिट पोलनी कॉंग्रेसला बहूमत दिले तर काही पोलनुसार त्रिशंकू विधानसभेचे संकेत दिले आहेत. या संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊनच कुमारस्वामी यांनी हि घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “जेडीएस किमान ५० जागा जिंकेल असा मला अजूनही विश्वास आहे. माझ्या अटी मान्य करणाऱ्या पक्षासोबत युती करण्यास तयार आहे.”
2018 च्या निवडणुकीमध्ये भाजपला हरवण्यासाठी जेडीएसने कॉंग्रेसशी हातमिळावणी केली होती. त्यानंतर आपल्या विरोधकांचा सामना करण्यासाठी कोणाशीही युती करणार नाही असे पक्षाचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या निर्देशानुसार कुमारस्वामी यांनी जाहीर केले होते.त्यानंतर जेडीएस पक्षाला कोण मुख्यमंत्रीपद देईल त्यांच्याशी युती करण्यास कुमारस्वामी तय़ार असल्याचे म्हटले आहे.









