सांगली
सांगलीच्या नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन आणि प्रा. डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरम यांच्यावतीने प्रा. डॉ. पी. बी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कलाग्राम या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संचालक गौतम पाटील आणि सोशल फोरमचे सचिव बी आर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे, हा महोत्सव १० जानेवारी २०२५ ते १८ जानेवारी २०२५ या दरम्यान सांगली येथे होणार आहे. यांतर्गत कृषी प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्थेतर्फे कर्मयोगी पुरस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांना दिला जाणार आहे. तसेच आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कार सेवानिवृत्त डी वाय एस पी राजाराम पाटील यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.









