वार्ताहर/उचगाव
सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित मण्णूर केंद्र क्लस्टर क्रीडा स्पर्धेमध्ये गोजगे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहेत तर शिवम कणबरकर,अनिकेत होनगेकर,मारुती सुतार,स्वराज्य येळगे,शिवम कणबरकर संपदा होनगेकर यांची व शाळेच्या व्हॉलीबॉल संघाची तालुकास्तरीय निवड झाली आहे. वैयक्तिक मुलांमध्ये शिवम प्रथम,थाळीफेक द्वितीय, अनिकेत, मारुती, तिहेरी उडीत द्वितीय, संकेत साखळी गोळाफेक तृतीय, स्वराज्य गोळाफेक, भालाफेक व साखळी गोळाफेक द्वितीय, वैभव 100 मी धावणे तृतीय क्रमांक. मुलींमध्ये नमिता 100 मी धावणे प्रथम क्रमांक व तिहेरी उडीमध्ये द्वितीय,संपदा गोळाफेक द्वितीय व थाळीफेक तृतीय,श्रुती 200 मी. धावणे तृतीया, गीता अडथळा शर्यतीत तृतीय, कोमल अडथळा प्रथम क्रमांक तर संघीक स्पर्धेमध्ये मुलांच्या (17 वयोगट) व्हॉलीबॉल संघाने प्रथम तर कबड्डीमध्ये द्वितीय स्थान,मुलांच्या (14वयोगट ) व्हॉलीबॉल संघाने द्वितीय स्थान तर मुलींच्या संघाने थ्रोबॉल, कबड्डी द्वितीय क्रमांक मिळविला. या विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक जे बी मुतगेकर यांचे प्रोत्साहन व क्रीडा शिक्षक जे डी बिर्जे, यु एम जाधव एस वाय मुतगेकर, एस आर पाटील, आर एस चिक्कमट, एस वाय खन्नूकर, एस एल कंग्राळकर,ए बी बामणे व एस जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









