विसापूर येथील कै. रा. शा. माने पाटील कुटुंबीय व गावकऱ्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेसाठी भरभरून मदत केली आहे. मी पन्नास लाख दिले आहेत. मात्र गावकऱ्यांचे प्रेम पाहून आणखी ५० लाख रुपये मदत मी आज जाहीर करतो.यामधून कर्मवीर अण्णांच्या स्वप्नातील शाळा उभी राहील,” असे प्रतिपादन माजी खासदार व उद्योगपती राम शेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.
“रयतशिक्षण संस्थेचे सचिव डॉ.विठ्ठल शिवणकर हुशार आहेत.गावातल्या शाळेसाठी कसा निधी आणायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे” असे गौरवोद्गार ठाकूर यांनी व्यक्त केले. विसापूर येथील कै. रा.शा. माने पाटील विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, मुख्याध्यापक एस. एम. मुलाणी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ अशा दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ठाकूर बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील अध्यक्ष स्थानी होते. मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या श्रीमती सरोजमाई पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, दक्षिण विभागचे अध्यक्ष माधवराव मोहिते, संस्थेचे सहसचिव डॉ.शिवलिंग मेनकुदळे, कौन्सिल सदस्य ॲड.रवींद्र पवार, सहसचिव राजेंद्र साळुंखे, जनरल बॉडी सदस्या श्रीमती हेमादेवी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
ठाकूर पुढे म्हणाले,”कर्मवीर अण्णांचा आशीर्वाद आणि डॉ.एन.डी.पाटील यांचा सहवास यामध्ये मी शिकलो आणि घडलो.आयुष्यात मिळणाऱ्या मिळकतीतून संस्थेच्या शाखांना मदत करणे ही शिकवण मला अण्णांनी दिली. विसापूर गावचे सुपुत्र डॉ. विठ्ठल शिवणकर हे संस्थेचे सचिव म्हणून लाभले हे संस्थेचे भाग्य आहे. डॉ. शिवणकर यांच्या गावच्या शाळेची अडचण ओळखून मी आणखी ५० लाख रुपये ची मदत शाळेला देतो.”
संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील म्हणाले,
“मागील व आताचे शिक्षण पूर्णपणे बदललेले आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपल्यात बदल करावा. जून पासून संस्थेच्या शिक्षण पद्धतीत बदल होणार आहे.”स्वागत व प्रास्ताविक सचिव डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले.प्रा.डी.ए.माने, माजी जि प सदस्य सुनील भाऊ पाटील मुख्याध्यापक एस.एम.मुलाणी, अनिशा मुलांणी यांनी मनोगत व्यक्त केले.सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक एस.एम. मुलाणी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी विभागीय अधिकारी श्री विनयकुमार हणशी, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, माजी सभापती पतंग बापू माने, कौन्सिल सदस्य जे.के. बापू जाधव,वाय.टी. देशमुख, डॉ. अजित सूर्यवंशी, वसंत बापू सावंत, विलास नाना शिंदे, डॉ. प्रताप पाटील, भगवानदादा माने, बळवंत चव्हाण, सरपंच अशोक मोहिते, उपसरपंच अशोक अमृतसागर संपत दादा माने, दिलीप माने आधी उपस्थित होते.आभार सहक्षिका व्ही. पी. पाटील यांनी मांडले. सूत्रसंचालन शिक्षक . सी.डी.खोत यांनी केले.
Previous Articleयोगीता, सरितादेवी, विकास, हिमांशू विजेते
Next Article कंग्राळी खुर्द परिसरात शिवजयंती साजरी








