वार्ताहर /किणये
द. म. शि. मंडळ संचलित ज्योती हायस्कूल, कर्ले यांच्यावतीने संतिबस्तवाड विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी कर्ले येथे उत्साहात झाले.
अध्यक्षस्थानी सातेरी पाटील होते. स्वागताध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक पुन्नाप्पा गोजेकर होते. मुख्याध्यापक पी. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. फीत कापून स्पर्धांचे उद्घाटन नावगे येथील बसवाणी मोटणकर यांनी केले.
सूर्यकांत कर्लेकर, बसवाणी सुतार, नारायण पाटील, वसंत सांबरेकर, मल्लाप्पा पाटील, कल्लाप्पा चिगरे, विनायक पाटील आदींनी दीपप्रज्वलन केले. मोनाप्पा पावशे, नामदेव सांबरेकर, नवनाथ खामकर, सातेरी कामती, पुंडलिक मुरकुटे, अरुण कणबरकर आदींच्या हस्ते विविध फोटो प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी कर्ले गावातील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रतिभा कारंजी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाच्या आहेत. तसेच या प्रतिभा कारंजी स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळतो, असे नरसिंग देसाई यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी सीआरपी विक्रम उपाध्ये, परशराम सुतार, मधु गुरव आदींसह पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक व शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
शुक्रवारी सायंकाळी या स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. माजी महापौर शिवाजी सुंठकर, निवृत्त सुभेदार मेजर पुंडलिक तारिहाळकर आदींच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.









