ऑनलाईन टीम/तरुण भारत मुंबई
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर चे नामांतर अहिल्या नगर करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावर ‘नामांतरचे स्वागत करतो पण यासोबत या शहराच्या विकासाची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे’ असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पडळकरांना मारला आहे.
पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हणले आहे कि.. पुण्यश्लोक अहिल्यादेवी या संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा मुस्लिम राजवटीत हिंदूंच्या मंदिरांची मोडतोड करण्यात आली तेंव्हा त्यांनी मंदिरांच्या जीर्णोद्धार चे महत्वपूर्ण काम केले. ज्या जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला त्याला अहिल्यादेवी असे नाव देण्यात यावे अशी सर्व अहिल्याप्रेमी जनतेची भावना आहे.
याला प्रतिक्रिया देताना.. ‘कोणत्याही परिसराचे,शहराचे नाव बदलण्यासाठी थोर व्यक्तीचे नाव चर्चेत येत असेल तर चांगली गोष्ठ आहे. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर ला देताना येथील लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्याला कोणते विचार दिले तर..लोकांचे हित जोपासले पाहिजे, लोकांना चान्गले रस्ते,पिण्याचे चांगले पाणी,धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार या गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे.









