कोलकात्यात होतेय चित्रिकरण, सोनी राजदानची चित्रपटात एंट्री
करिश्मा कपूर पुन्हा एकदा चित्रपटजगतात सक्रीय होतेय. झी स्टुडिओजचा चित्रपट ‘ब्राउन’द्वारे ती पुनरागमन करत आहे. या चित्रपटात करिश्मा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. ‘ब्राउन’ हा क्राइम ड्रामा असून अभिनय देव याचे दिग्दर्शन करत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री हेलेन देखील या चित्रपटात काम करत आहेत. तर सोनी राजदान यांचीही या चित्रपटात एंट्री झाली आहे.

ब्राउन चित्रपटाची कहाणी कोलकात्या शहरावर आधारित आहे. करिश्मा याचे चित्रिकरण सध्या कोलकात्यात करत आहे. हा चित्रपट अभीक बरुआ यांचे पुस्तक ‘सिटी ऑफ डेथ’वर बेतलेला आहे. या चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत वेगळी आणि खऱयाखुऱया लोकांशी साधर्म्य दर्शविणारी आहे. ही भूमिका साकारणे माझ्यासाठी एक आव्हान असल्याचे सोनी राजदान यांनी म्हटले आहे.
या चित्रपटात सूर्य शर्मा देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सोनी राजदान यांची मुलगी आलियाचा विवाह अलिकडेच कपूर घराण्यातील रणवीरसोबत पार पडला आहे. विवाहानंतर दोन्ही परिवारांचे सदस्य स्वतःच्या कामांमध्ये गुंतले आहेत. आलिया सध्या स्वतःच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रिकरण करत आहे. यात ती गॅल गडोटसोबत दिसून येणार आहे.









