वृत्तसंस्था/ काबुल
30 ऑगस्टपासून लंकेत सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाण संघाची घोषणा करण्यात आली असून अष्टपैलू करीम जनतचे पुनरागमन झाले आहे.
25 वर्षीय करीम जनत याने आतापर्यंत एकमेव वनडे सामना 2017 साली झिंबाब्वेविरुद्ध खेळला होता. करीम जनतने गेल्या जून महिन्यात बांगलादेशविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या 17 जणांच्या अफगाण संघामध्ये अष्टपैलू एस. अश्रफचे पुनरागमन झाले असून वफादार मोमंद आणि अझमतुल्ला ओमरझाई यांना संघातून वगळण्यात आले आहे. हसमतुल्ला शाहिदीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणचा पहिला सामना बांगलादेशबरोबर 3 सप्टेंबर रोजी लाहोरमध्ये होणार आहे.
अफगाण संघ : गुरबाज, इब्राहिम झद्रन, रियाज हसन, रेहमत शहा, हसमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल झद्रन, मोहमद नबी, इक्रम अलीखिल, रशीद खान, गुलबदीन नईब, करीम जनत, अब्दुल रेहमान, एस. अश्रफ, मुजीब उर रेहमान, नूर अहमद, मोहम्मद सलीम आणि फारुकी.









