माडखोल माजी सैनिक संघटनेचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘२६ जुलै १९९९ या कारगिल विजय दिवस’ चे औचित्य साधुन माडखोल माजी सैनिक संघटनेने आयोजित केलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला माडखोल ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, भरत गावडे, माडखोल माजी सैनिक संघटना अध्यक्ष मसाजी राऊळ, माजी अध्यक्ष पांडुरंग सावंत, उपाध्यक्ष जगन्नाथ परब, सचिव उमेश कारीवडेकर, सदस्य पांडुरंग सावंत, सुरेश नार्वेकर महेश पालव, नारायण राऊळ, प्रकाश राऊळ, चंद्रकात शिरसाट, जनार्दन सावंत, सहदेव राऊळ, विठ्ठल पालव, महादेव नाईक, भिवा राऊळ, पुंडलिक राऊळ, नंदकिशोर राऊळ, शरद राऊळ आदी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यानिमित्त माडखोल माजी सैनिक संघटनेच्यावतीने माडखोल केंद्रशाळा नं १ आणि धवडकी नं २ दोन्ही शाळेत वृक्षारोपणासह इतर उपक्रम राबविण्यात आले. या दोन्ही शाळांच्या परिसरात सुमारे ८५ सुपारीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.









