प्रदर्शनाची तारीख जाहीर
मोठ्या पडद्यावर स्वत:ची जादू दाखविल्यावर करिना कपूर आता ओटीटीवर पाऊल ठेवणार आहे. तिच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘जाने जां’ असून तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर अन् प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोषने केले असून जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यासारखे दमदार कलाकार दिसून येणार आहेत.

नेटफ्लिक्स इंडियाने सुजॉय घोष यांचा आगामी थ्रिलरपट ‘जाने जां’ चा टीझर अन् प्रदर्शनाची तारीख जारी केली आहे. हा चित्रपट जपानी कादंबरीकार कियागो हिगाशिनो यांची प्रसिद्ध कादंबरी ‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’वर आधारित असणार आहे.
करिना कपूरचा हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. करिना कपूर यापूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात आमिर खानसोबत दिसून आली होती. हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता. तर चालू वर्षी ती दोन चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. जाने जां अन् द बकिंगहम मर्डर या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा ‘द क्रू’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.









