करिना कपूर खानने तिच्या ओ टी टी पदार्पणाचे शूट नुकतेच पूर्ण केले असून तिच्या आगामी नेटफ्लिक्स प्रोजेक्ट “द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स” च्या सेटवर शेवटच्या दिवशी भेट दिली. शुक्रवारी , करिनाने तिच्या इन्स्ट्राग्रामवर एक झलक शेअर केली त्यात तिचा मुलगा तैमूर अली खान सुद्धा तिच्या सोबत शूटिंगच्या दिवशी सेटवर तिच्यासोबत आला होता . तिने फोटोला, ” शेवटच्या दिवशी पाहुणा सेटवर” असे कॅप्शन दिले
फोटोत करीना तिच्या मांडीवर बसलेल्या तैमूरसोबत सेल्फीसाठी पोज देताना दिसत आहे. कारण , तो टोपीने आपला चेहरा लपवत असून करीना पोज देण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यावेळेस ती स्पष्टपणे म्हणाली की तैमूरला ही त्याच्या वडीलाप्रमाने म्हणजेच सैफ अली खान प्रमाणेच फोटो क्लिक करणे आवडत नाही .
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
कुटुंब आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी पोस्टवर त्वरित प्रतिक्रिया दिली , करीनाची मैत्रीण पूनम डरनानीया हिने त्यावर प्रतिक्रिया देत हार्टशेप चे चिन्ह पाठवले तसेच ‘आदरणीय” देखील खाली लिहले. करीनाची बहीण करिष्मा कपूर हिने देखील टिप्पणी विभागात अनेक निळ्या रंगाचे हार्ट टाकून हात उंचावणारे देखील काही चिन्ह टाकली. करीनाची मेहुणी आणि सैफ अली खानची बहीण सबा पतौडी यांनी देखील टिप्पणी विभागात हृदयाचे काही चिन्ह पाठवली आणि “ahhh” अशी कमेंट देखील केली.
करीना कपूरचे आगामी प्रोजेक्ट
दरम्यान वर्कफ्रंट वर करीना कपूर खान सुजॉय घोषच्या दिग्दर्शनाचा अद्याप बाकी असलेल्या चित्रपटातून तिचे ओ टी टी पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. एका निवेदनानुसार करीनाचा नवीन चित्रपट “एक मर्डर मिस्ट्री” असून लवकरच नेटफ्लिक्सवर प्रवाहित होईल . केगो हिगशिनोच्या सर्वात प्रशांसित कामांपैकी एकाचे स्क्रीन रूपांतर आहे, “द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्सचे करीना देखील अमीर अभिनित लाल सिंग चड्डा च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









