सुजॉय घोषच्या चित्रिकरणाला प्रारंभ
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’वरून चर्चेत आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत झळकणार आहे. लाल सिंह चड्ढानंतर तिने स्वतःच्या ओटीटी पदार्पणाची तयारी सुरू केली आहे. सुजॉय घोष यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’मध्ये ती काम करत आहे.

कलिम्पोंग येथे या चित्रपटाच्या काही हिस्स्याचे चित्रिकरण पार पडले आहे. या सेटवरील काही छायाचित्रे तिने शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये या हिल स्टेशनमधील सुंदर दृश्य दिसून येते. या चित्रपटात करिनासोबत अभिनेता जयदीप अहलावत देखील दिसून येणार आहे. चित्रपटाची कहाणी जपानी लेखक कीगो हिगाशिनो यांच्या पुस्तकावर आधारित आहे.
या चित्रपटाच्या कथेत हत्या, गूढ, रोमांच आणि बरेच काही आहे. या चित्रपटासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. हा चित्रपट माझ्यासाठी ओटीटी पदार्पणाचा असणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शक असल्याने याची कथा अत्यंत प्रभावीपणे मांडली जाणार असल्याचे करिनाने म्हटले आहे.









