करिना कपूरने हंसल मेहतांच्या आगामी प्रोजेक्टचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. मारी ऑफ ईस्टटाउन या वेबसीरिजमध्ये केट विन्सलेटने साकारलेल्या भूमिकेसारख्या व्यक्तिरेखेत करिना दिसून येणार आहे. चित्रपटात करिना एका आईसह तपास अधिकाऱयाची भूमिका पार पाडणार आहे. हा चित्रपट बंकिंगहॅमध्ये झालेल्या हत्येने प्रेरित असल्याचे सांगण्यात आले. या चित्रपटाचे नाव ‘बंकिंगहॅम मर्डर्स’ ठेवण्यात आले आहे.
चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स आणि माहाना फिल्म्सने केली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण ब्रिटनमध्ये पार पडले आहे. करिना कपूरनुसार या चित्रपटाचे संवाद हे 80 टक्के इंग्रजी भाषेत असणार आहे. तर 20 टक्के संवाद हिंदी भाषेतील आहेत.

मॉरी ईस्टटर्सची भूमिका अत्यंत पसंत आहे, हंसल मेहता यांनी अशाच प्रकारच्या भूमिकेचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडल्यावर मला मोठा आनंद झाला. आम्ही या भूमिकेवर दीर्घकाळा चर्चा केल्याचे करिनाने सांगितले आहे.
बकिंगहॅम मर्डर्स या चित्रपटाच्या व्यतिरिक्त करिना ही सुजॉय घोष यांचा चित्रपट ‘द डिव्होटिशन ऑफ सस्पेक्ट एक्स’मध्येही दिसून येणार आहे. हा चित्रपट जपानी कादंबरीवर बेतलेला आहे. तसेच या चित्रपटातून करिना ओटीटीवर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. करिनासोबत यात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा हे कलाकार दिसून येणार आहेत. यानंतर करिना ही राजेश किशन यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘द क्रू’चे चित्रिकरण सुरू करणार आहे. या चित्रपटात करिनासोबत तब्बू, क्रीति सेनॉन मुख्य भूमिकेत असणार आहे.









